पुण्यातील स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी महपौर मुरलीधर मोहोळ यांनी केली ही महत्वाची घोषणा!

74

राज्य सेवा पुर्व परिक्षेची तारीख लांबवल्यानंतर संपूर्ण राज्यभरात तणाव निर्माण झाला होता. यापैकी पुण्यात प्रचंडसंख्येने तरुन जमले होते. पुण्यामध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्यात सगळ्यात जास्त रोष बघायला मिळाला. मात्र तरिदेखील पुण्याचे महपौर मुरलीधर मोहोळ यांनी विद्यार्थ्यांच्या हितार्थ निर्णय घेतला आहे. पुण्यातील स्पर्धा परिक्षांच्या कोचींग क्लासला पन्नास टक्के ऊपस्थितीत परवानगी दिल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार बघता नुकतीच ऊपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ऊपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये येणार्‍या काळातील पुण्यात कोरोना प्रसाराच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यादृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीतच मोहोळ कोचींग क्लासला परवानगी देण्याची मागणी केली. अजित पवार व प्रशासनाने या परवानगीस मान्यता दिली आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या या मागणीमुळे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे. अॉनलाईन शिकवणीत अनेक अडचणी येतात. त्यामुळे पन्नास टक्के का होईना परंतू प्रत्यक्षात जाऊन शिकण्याचा फरक पडणार असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. तसेच पुर्व परिक्षांच्या पार्श्वभूमिवरील हा निर्णय नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. असे मत विद्यार्थ्यांनी यावेळी मांडले अाहे.