ही तर सुरुवात आहे, अजुन ठाकरे सरकारचे अर्धे डझन मंत्री आउट होणार आहे, किरीट सोमय्यांचा दावा

13

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई ऊच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजिनामा दिला आहे. अनिल देशमुख यांच्या राजिनाम्यानंतर भाजपमधून प्रतिक्रिया येत आहे. यातच भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

“सचिन वाझेंनी जे केले तेच परमबीर सिंह यांनी केले आहे. सचिन वाझेंनी सगळ्यांची नावे दिलेली आहे. परमबीर सींग यांनीसुद्धा अनिल देशमुख यांचे नाव घेतले. आता अनिल देशमुख यांनी शरद पवार आणि ऊद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुनच वसुली केली जात होती, असे स्पष्टच सांगावे. म्हणजे विषयच संपेल” असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात अनेकजण आहेत. माझ्याकडे असे काही कागदपत्र आहेत. ज्यामध्ये हा फंड वरवरपर्यंत जात होता आणि त्याचे अनेक लाभार्थी असल्याचे दिसते. मुख्यमंत्री कार्यालयात याकरिता अनिल परब काम करत होते असा थेट अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्यांनी आरोप केले आहेत.

अजून याप्रकरणात सीबीआयने याप्रकरणात तपास सुरु केलेला नाही. जेव्हा सीबीआय, एनआयए आणि ईडी या सगळ्या यंत्रणा कामाला लागतील तेव्हा ठाकरे सरकारमधील अर्धे डझन नावे समोर येतील असेसुद्धा ते यावेळी म्हणाले.