कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावले जात असल्याने स्मशानभूमीत चार ते पाच तास प्रतिक्षा करावी लागते आहे. त्यामुळे मृताचे कुटुंबिय रुग्णवाहिकेला तासाला एक हजार रुपयेप्रमाणे चार ते पाच हजार रुपये, तर तीन हजार रुपये याप्रमाणे १२ ते १५ हजार रुपये मोजत आहेत.
शहरातील सर्व खासगी रुग्णवाहिका त्याब्यात घेऊन त्यांचे संचलन करण्याची सूचना जगताप यांनी पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा आऱटीओंना पत्र देऊन केली.
कोरोना रूग्णाला रुग्णालयांमध्ये किंवा विविध डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तसेच कोरोनाने मरण पावलेल्याला स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांचे कुटुंबिय किंवा नातेवाईकांची लूट करीत आहेत.
याकडे प्रशासनाचे लक्ष नाही ही त्याहून गंभीर बाब आहे, अशी संतप्त टीका पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज केली.