“हा महाराष्ट्र आहे आणि ईथे शिवसेना आहे” “अॉपरेशन लोटस” वर काय म्हणते शिवसेना?

12

पड्डुचेरीचे असणारे कॉंग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. पड्डुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी हे बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी झाले. परिणामी तेथील कॉंग्रेस सरकार कोसळले असून आता त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे. पड्डुचेरीत अॉपरेशन लोटस यशस्वी झाले आहे. असा अविर्भाव भाजप नेत्यांचा आहे. तर महाराष्ट्रातसुद्धा मार्च-एप्रील दरम्यान अॉपरेशन लोटस राबवून येथील सरकार पाडणार असल्याचे सुतोवाच काही भाजप नेत्यांनी केले. शिवसेनेने मात्र यास प्रत्युत्तर देत भाजपचा समाचार घेतला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनातील अग्रलेखातून अॉपरेशन लोटस संदर्भात भाजोवर टीका करण्यात आली आहे. “महाराष्ट्रात अॉपरेशन लोटस राबवणार असे स्वप्न काही भाजपचे नेते बघतायत. मात्र त्यांनी स्वप्नातच राहावे. कारण हा महाराष्ट्र आहे आणि इथे घटक पक्षांत शिवसेना आहे. त्यामुळे नसते ऊद्योग ईथे खपवून घेतले जाणार नाही.” असा सज्जड दम भाजपला या अग्रलेखातून देण्यात आला आहे. तसेच सत्तेसाठी भाजप स्वायत्त संस्थांचा ससेमीरा विरोधकांच्या पाठीशी लावत आहे. मात्र याचे गंभीर परिणाम देशास भोगावे लागणार आहेत. “जे पेराल तेच ऊगवेल” असेसुद्धा अग्रलेखात नमुद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रा गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या सत्तानाट्यानंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले. ज्यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचा सहभाग आहे. हे त्रीपक्षीय सरकार असल्यामुळे लवकर हे सरकार पडणार आहे. असे भाजपकडून सातत्याने सांगण्यात येत होते. मात्र महाविकासआघाडी सरकारला पाडण्यात भाजप अद्याप यशस्वी झालेला नाही.

महाराष्ट्राच्या राज्यपालांवरसुद्धा या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. राज्यपाल कुठलेही असो ते दिल्लीधर्जीणेच आहेत. मात्र हे लोकशाहीसाठी घातक आहे. आपल्या राज्यातील राज्यपालांनीसुद्धा हे लक्षात घेणे जरुरी आहे. यावेळी राज्यपाल यांचा भाज्यपाल असा ऊल्लेखदेखील यावेळी करण्यात आला आहे.