केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. महाविकासाघाडीतील तिन्ही पक्षांनी यासाठी पाठिंबा दिला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची भूमिका घेतली होती. हा कोणताही राजकीय बंद नाही. असे त्यांनी सांगितले.
हे आंदोलन एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी हा बंद पाळावा,’ असं आवाहनही संजय राऊतांनी केले आहे. लॉकडाऊनमध्ये सगळे घरी बसलेले असताना शेतकऱ्यांनी आपल्याला साथ दिली आहे. आज त्यांना आपली गरज असेल, तर त्यांना साथ द्यावी,’ असेही राऊत म्हणाले. गेल्या खूप दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर बसून थंडीत आंदोलन करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी क्षेत्रातील तज्ञ समजले जातात,’ असेही राऊतांनी सांगितले आहे. सर्वांनी या आंदोलनामध्ये स्वइच्छेने सहभागी व्हावे, असे आवाहन संजय राऊत यांनी जनतेला केले आहे. त्यामुळे उद्याच्या भारत बंदमुळे केंद्र सरकारची भूमिका बदलणार का बैठकीत काय तो़डगा निघणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.