देशभरात गेल्या वर्षीपासून कोरोनाचं संकट आलं आहे. या रोगावर लस बनवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. ८ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर जगभरातील शास्त्रज्ञांना यश आलं. देशातील सिरम इन्स्टिट्यूटने पहिल्या लसीचा मान मिळवल्यानंतर या कंपनीचे जगभरात खूप कौतुक केले गेले होते. पुण्यातील सीरम इंस्टीट्युटला गुरुवारी आग लागून या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सीरम इंस्टिट्युटच्या आग लागलेल्या प्लांटची पाहणी करणार आहे. त्यासाठी आज मुख्यमंत्री दुपारी 3 वाजता हेलिकॉप्टरव्दारे पुण्याकडे जाणार आहे. सीरमला लागलेल्या आगीवरून जनतेकडून संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. घातापाताची अशी कोणतीही शक्यता नसल्याचे पवारांनी सांगितले. ‘आज आपण असे बोलणे देखील बरोबर नाही. सीरम संस्था आणि तिथे काम करणाऱ्या सर्व संशोधकांवर आम्हाला विश्वास आहे. ही घटना घातापाताची नसून पुर्णपणे अपघात आहे’ असे मत पवारांनी व्यक्त केले. सीरम संस्थेला कोरोना या महामारी विरुद्ध लस शोधण्यात यश मिळालं आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्यापासून 5 किमी अंतरावर हा अपघात झाला आहे. असेही पवार म्हणाले