औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील राजकारण तापू लागलं आहे. सगळेच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याच्या मुद्यावर शिवसेना आणि भाजप एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला काँग्रेसचा विरोध असल्याचं सांगितलं आहे. त्यावरून भाजपने शिवसेनेला टार्गेट केलं आहे.
दरम्यान आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही थोरातांना पाठींबा देत नामांतराला विरोध केला आहे. औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे