“हे परिवहन मंत्री नाही हे तर परिवारमंत्री” भाजपच्या या नेत्याची अनिल परब यांच्यावर टीका

9

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधातील भाजपने विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामध्येच भाजपचे आ. नितेश राणे यांनीसुद्धा सभागृहात वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत राज्य सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांवर टीका केली आहे. यावेळी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना लक्ष केले आहे.

नितेश राणे सभागृहात बोलतांना म्हणाले, अध्यक्ष महोदय, आपल्या राज्याला परिवहन मंत्र्याची गरज आहे. विद्यमान मंत्रीमहोदय परिवहनमंत्र्यांची भूमिका निभावत नसून परिवारमंत्री असल्यासारखे वागत आहेत. ते कलानगरच्या अाजूबाजूसच घुटमुळत असतात. त्यांनी कलानगरच्या बाहेर पडावं. एसटी आहे, मंत्रालय आहे, एसटी कामगारांचे प्रश्न आहेत. असा खोचक सल्ला त्यांनी अनिल परब यांना दिला.

तसेच नितेश राणे यांनी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर निशाना साधला. अर्थसंकल्पातून जास्त अपेक्षा ठेऊ नये, राज्यासमोर सध्या आर्थिक संकट आहे. असे सरकारडून सांगण्यात येत आहे. मात्र हे संकट केवळ मध्यमवर्गीय, कामगार आणि शेतकर्‍यांकरताच आहे का? असा प्रश्न नितेश राणेंनी केला. सरकारमधील माणसं मोकाटपणे लुट करत आहेत, भ्रष्टाचार करत आहे. असेसुद्धा नितेश राणे यावेळी म्हणाले.