“हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचा पुरावा,” सरकारवर का संतापल्या चीत्रा वाघ

8

नुकतीच कुख्यात गुंड गजानन मारणे याची जेलमधून सुटका करण्यात आली. जेलमधून सुटका झाल्याच्या आनंदात मारणे समर्थक मोठ्य संख्येने तळोजा कारागृहाबाहेर जमले होते. त्यानंतर गजानन मारणे यांची मारणे टोळीने भव्य मिरवणुक काढली. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर गाड्यांच्या प्रचंड मोठ्या ताफ्यात सिनेस्टाईलने मिरणवणुक काढत मारणेचे पुण्यात स्वागत करण्यात आले. दरम्यान मिरवणुकीचा व्हिडिअो व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय झाला होता. भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मात्र याप्रकारावर प्रश्नचिन्ह ऊपस्थित करत सरकारवर टीका केली आहे.

राज्यात रोज खुन, हल्ले, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे तर घडतातच. परंतू एखादा नामचीन गुंड सुटका झाल्यानंतर भव्य मिरवणुक काढतो हे चांगल्या समाजासाठी लाजीरवाणं आहे. तसेच हा सरकारच्या अस्तीत्वहीनतेचा प्रकार असल्याचेसुद्धा चीत्रा वाघ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर खुन, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. पप्पू गावंडे आणि अमोल बधे यांच्या हत्येच्या गुन्ह्यअंतर्गत २०१४ तो पासून जेलमध्ये होता. जेलमधून सुटका होताच मारणे समर्थकांनी भव्य मिरवणुक काढली. परंतू आता हा प्रकार अंगलट आला आहे. गजानन मारणे याच्याविरुद्ध कोथरुड पोलिसांत तक्रात दाखल करण्यात आली आहे. तसेच गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांनी ऊर्से टोलनाक्याजवळ टोल न भरताच दहशतीचे वातावरण निर्माण करण्याकरिता फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली.

मारणे टोळीच्या मिरवणुकीनंतर गृहराज्यनंत्री शंभुराजे देसाई एक्शननध्ये आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर मिरवणुकीचे व्हिडिअो फुटेज बघून चौकशी करुन त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गजानन मारणे प्रकरणावर सर्वत्र चुप्पीचे वातावरण असतांना चित्रा वाघ यांनी मात्र यावर संतप्त प्रतिक्रिया देत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.