हे तर नामर्दाचे सरकार, चीत्रा वाघ यांची घणाघाती टीका, पत्रकारपरिषदेत पुराव्यांचा वाचला पाढा

23

पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणावरुन भाजप प्रदेश ऊपाध्यक्षा चीत्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नुकतेच पुजाने पुण्यात ज्याठिकाणी आत्महत्या केली, त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांनी भेट दिली. त्यानंतर पोलिस स्टेशन गाठत त्यांनी पोलिसांना प्रश्न केले. आज नाशिकमध्ये पत्रकारपरिषदेत त्या चांगल्याच भडकल्या. एवढे सगळे पुरावे असूनसुद्धा सरकार कारवाई नाही करत, म्हणजे हे तर नामर्दाचे सरकार आहे. अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.

चीत्रा वाघ यांनी पुजा चव्हानच्या मृत्युच्या दिवशीचा संपूर्ण तपशीलच समोर ठेवला. त्यादिवशी पुजा चव्हानच्या मोबाईलवर संजय राठोड या नावाने ४५ मीस्क कॉल्ड आले होते. परंतू पोलिसांनी यावर अद्याप कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. तसेच प्रत्यक्षदर्शी असणार्‍या अरुण राठोडने १०० क्रमांकावर फोन लाऊन संपूर्ण कबुली जवाब एकदा नाही तर तीनदा दिला. तरिसुद्धा पुणे पोलिस कारवाई करत नाहीये. पोलिस राजकीय दबावात काम कथे आहे. हे याठिकाणी स्पष्ट दिसते आहे. असेसुद्धा त्या यावेळी म्हणाल्या.

व्हायरल झालेल्या १२ अॉडिअो क्लीप्स ज्यामध्ये संजय राठोड यांचाच आवाज आहे, हे स्पष्ट आहे. तरी सरकार कारवाई करत नाही. यावरुन हे सरकार नामर्दाचे सरकार असल्याचे प्रतीत होते. शिवरायांच्या नावावर सत्तेत येणार्‍यांनी आज महाराष्ट्रात मोगलाई निर्माण केली आहे. असेसुद्धा त्या यावेळी म्हणाल्या.

चीत्रा वाघ यांनी पुन्हा ऊद्धव ठाकरेंकडून अपेक्षा असल्याचे व्यक्त केले. ऊद्धव ठाकरे जर आज मुख्यमंत्री नसते तर संजय राठोडला त्यांनी फाडुन खाल्लं असतं असे वक्तव्यसुद्धा त्यांनी केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामध्ये पुजा चव्हान प्रकरण मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी चांगलीच वाढणार असल्याचे जवळजवलळ स्पष्टच झाले आहे.