पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हजारा विद्यापीठाने मुली तसेच महिला शिक्षिकांना टाईट जिन्स घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर मुलांना बाळी घालणं आणि मोठे केस ठेवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. विद्यापीठात प्रवेश करताच विद्यार्थीनींना स्कार्फ म्हणजेच हिजाब घालणे बंधनकारक केले आहे. महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तान सरकारने या निर्णयाबाबत विद्यार्थी अभ्यासाकडे जास्त लक्ष देतील, अशी अजब प्रतिक्रिया दिली आहे.
विद्यापीठाच्या या अजब नियमामुळे पाकिस्तानमध्ये काही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. जारी केलेल्या या नियमांची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि प्राध्यापिकांनाही हा नियम लागू करण्यात आला आहे. नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट, हाफ जीन्स आणि मेकअप करुन विद्यापीठात येण्यास मनाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या खैबर फख्तूनख्वा प्रांतातील हजारा विद्यापीठानं विद्यार्थी आणि शिक्षक, प्राध्यापकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे.
त्याचबरोबर महागड्या हँडबॅग घेऊन आणि अलंकार घालून विद्यापीठात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी फक्त शॉल, अबाया किंवा सलवार-कमीज अशा साध्या वेशात विद्यापीठात येण्यास सांगितले आहे. निर्णय गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांमधील दरी कमी करतानाच, त्यांच्यातील आणि शिक्षकांमधील स्पर्धा संपवेल, असंही बांगश यांनी म्हटले आहे.