“हे तर चित्रातले वाघ, आमच्या चित्रा ताईच खर्‍या वाघ” भाजपच्या या नेत्याचा सेनेवर हल्लाबोल

17

पुजा चव्हान अ‍ात्महत्या प्रकरणावरुन राजकारण दिवसेंदिवस तापतेच आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी भाजपकडून होते आहे. भाजप प्रदेश ऊपाध्यक्षा चीत्रा वाघ या आक्रमक भूमिका घेऊन सरकारला प्रश्न करत आहेत. संजय राठोड हाच पुजा चव्हानचा हत्यारा आहे, मंत्रीमंडळातून त्याची तत्काळ हकालपट्टी करा असा संताप त्या वारंवार व्यक्त करत आहे. तसेच चित्रा वाघ यांच्या पतीवर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या हा आवाक ऊठवणार्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपने म्हटले आहे. तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर टीका करय यांनी चीत्रा वाघ यांचे समर्थन केले आहे.

संजय राठोड यांच्याविरोधात एवढे ढळढळीत पुरावे चीत्रा वाघ यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले आहे. तरिदेखील संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची हिम्मत होत नाहीये. स्वत:ला वाघासारखे समजणारे आज घाबरलेले जाणवत आहे. त्यामुळे “हे तर फक्त चित्रातलेच वाघ आहे”. अशाप्रकारे प्रसाद लाड यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. तसेच आमच्या चीत्रा ताईच खर्‍या वाघ आहेत. असे म्हणत चीत्रा वाघ यांची पाठराखणसुद्धा केली आहे.

पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संजय राठोड यांचा “हत्यारा” शब्दांतच त्यांच्याकडून ऊल्लेख होतो आहे. पुणे पोलिस संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पोलिस तपास काढून घेण्यात यावा. अशी मागणी त्यांनी केली आहे. नुकतेच चित्रा वाघ यांनी पुजा चव्हानने ज्याठिकाणी आत्महत्या केली त्याठिकाणी भेट दिली. त्यानंतर पोलिस स्टेशन गाठत त्यांनी अनेक प्रश्न ऊपस्थित केले.

दरम्यान चीत्रा वाघ यांना धमक्या येत असल्याचेसुद्धा समोर आले आहे. मात्र या धमक्यांना न घाबरता चीत्रा वाघ सातत्याने आवाज ऊठवत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून त्यांचे कौतुक होते आहे. तसेच आता लवकरच भाजप महिला आघाडी या मुद्द्यावरुन रस्त्यावर ऊतरणार असल्याचेसुद्धा सांगण्यात येत आहे. अौरंगाबाद आणि राज्यातील काही शहरांमध्ये भाजप महिला आघाडीकडून निदर्शनेसुद्धा करण्यात आली आहे.