‘हे’ तर अनपेक्षित : ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का…

202

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पोपटराव पवार  यांना स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपयश आलं आहे. अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार गावातील ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अपयश आले आहे. पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार गावात गेल्या ३० वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होते. मात्र, यंदा ही परंपरा मोडीत निघाली आहे.

राळेगणसिद्धीमधील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तेथील आमदार निलेश लंके आणि अण्णा हजारेंनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, त्यात यश आलेले नाही. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आ. निलेश लंकेंनी तब्बल २५ लाख रुपयांच्या निधींची घोषणा केली होती.

पारनेर तालुक्यातील जवळपास १० ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यास यश आले आहे. राळेगणसिद्धीसह हिवरे बाजार गावात अण्णा हजारे व पोपटराव पवार या दोन्ही दिग्गज व्यक्तींना अपयश आल्याने मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही गावात आता ग्रामपंचायत निवडणुका होतील. त्यामुळे जिल्ह्यामध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.