‘या’ राज्यमंत्र्याचा मोदी सरकारवर प्रश्नाचा हल्लाबोल

7

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे. मात्र, कांद्याचे भावांना अद्यापही उठाव मिळालेला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, कांद्याच्या दरावरून राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे.

एकीकडे शेतकरी हिताचे तीन कायदे आहेत. शेतीमालास भाव मिळेल असं सांगणारे आयात धोरणावर का गप्प बसलेले आहेत? बांगलादेशला जे जमले ते भारताला का नाही? यामुळे सरकार कोणासाठी काम करते हे स्पष्ट लक्षात येत आहे,” अशी टीका कडू यांनी मोदी सरकारवर केली आहे.

आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्याकडे वरील प्रकारे आयातकर लावून स्थानिक शेतकऱ्यांचं होणार्‍या नुकसानापासून वाचवावं. निर्यातबंदी व आयातीस मोकळे रान उपलब्ध करून देणार्‍या धोरणांचा आम्ही सक्रियपणे विरोध करणार आहोत,” असा इशारा बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिला.

“मागील महिन्यापासून भारताने निर्यातबंदी मागे घेतली. यामुळे बांगलादेशात लाल कांद्याची आयात सुरू झाली. परंतु तेथील शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून, बांगलादेशनं कांद्यावर दहा टक्के आयातकर लावला. यामुळे आयातीत कांद्याचे सौदे तोट्यात गेले. असा आरोपही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर केला आहे.