बँकिंगशी संबंधित हा नियम दोन दिवसांनंतर बदलणार, होणार जबरदस्त फायदा

7

पुढील महिन्यापासून देशात बँकिंगशी संबंधित नियमात बदल होणार आहे. खरंतर पुढच्या महिन्यापासून रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधा २४ तास आणि सात दिवस उपलब्ध असणार आहे. म्हणजेच ग्राहक RTGS द्वारे वर्षाच्या ३६५ दिवसांतून कधीही पैशांचा व्यवहार करू शकतील. रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर महिन्यात RTGS २४ तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता.

RBI चे म्हणणे आहे की, ही सुविधा सुरू झाल्यावर भारत जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक होईल ज्यांच्याकडे २४×७×३६५ मोठ्या मूल्याची रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे. आता महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी आरटीजीएस सिस्टम सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध असेल.