झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरे विकता येणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. याबाबत सरकार निर्णय घेणार असून यामुळे सरकारच्या तिजोरीत भर पडणार असून म्हाडाची लँड बँकही वाढेल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
राज्यातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.शहर आणि उपनगराच्या समुद्रकिनाऱ्यालगत अनेक दशकापासून वसलेल्या झोपड्यांचा पुनर्विकास म्हाडा आणि एसआरएमार्फत करण्याचा सरकारचा विचार आहे.
कोणतीही एसआरएची योजना ही 10 ते 15 वर्षांच्या अगोदर तयार होत नाही. त्यामुळे त्याला घर मिळायला 15 वर्षे लागतात. यामध्ये दोन पिढ्यांचे नुकसान होते. यामुळे या नियमांत बदल करण्यात येणार आहे. दरम्यान, एसआरएमधील खरेदी विक्री केलेल्या रहिवाशांना नोटीस पाठवली असून याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
ज्या विकासकांनी अद्याप घरं दिलेली त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे, असा इशारा आव्हाड यांनी दिला.
सगळ्या बीडीडी चाळींच्या बांधकामाचे या महिन्यात उदघाटन कार्यक्रम होणार आहे. वरळी येथील चाळीत उदघाट्नचा कार्यक्रम असेल. तीन ते चार वर्षात बीडीडी उभी राहील असा आमचा प्रयत्न आहे.