यंदाचा थर्टीफर्स्ट नेहमीसारखा नाही,त्यामुळे लोकांनी सहकार्य करावं: BMC आयुक्त इकबाल सिंह चहल

6

थर्टीफर्स्टला हॉटेल, पब, रिसॉर्टमध्ये ज्या कुठल्या पार्टी करायच्या असतील, त्यांना रात्री 11 पर्यंतच परवानगी आहे. लोकांना लग्न, पार्टी, इतर कार्यक्रम रात्री 11च्या आधी करावे लागतील.”यंदाचा थर्टीफर्स्ट नेहमीसारखा नाही, त्यामुळे लोकांनी सहकार्य करावं, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केलं आहे.

कोरोनाचा नवीन प्रकार अद्याप भारतात आला असल्याचं वाटत नाही. पण आम्ही खबरदारी म्हणून मागच्या 15 दिवस ट्रॅव्हल करत असलेल्या लोकांनी त्यांची हिस्ट्री द्यावी हे आवाहन केले आहे,” असंही इकबाल सिंह चहल म्हणाले.

लोकल ट्रेनचा विषय हा राज्य सरकारचा आहे आणि तेच याबाबत निर्णय घेतील, असं चहल यांनी स्पष्ट केलं.दिवसभर लोकांवर नजर ठेवण्यासाठी आमच्याकडे टास्क फोर्स आहे.पण ते 24 तास करणं शक्य नाही म्हणून नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे,” असं चहल म्हणाले.इकबाल सिंह चहल बीबीसी मराठीला नव्या नियमांबाबत सविस्तर मुलाखत दिली.तेव्हा ते बोलत होते.