‘जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले ते महाराष्ट्र द्रोही, फडणवीसांची भेट घेण्यासाठी साडेचार वर्षे वाट पाहिली’

427

बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्र द्रोही सिद्ध केलं आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रातून समिती विरोधात प्रचाराला कोणीही येणार नाही. कारण हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलं आहे. असे सूतोवाच शेळके यांनी केले.

ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्रात होते त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी साडेचार वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे आम्हाला फडणवीस यांच्याकडून अपेक्षा नाहीत, अस शुभम शेळके म्हणाले.

राष्ट्रवादी आणि शिवसेना सुरुवातीपासून या लढ्यासाठी आग्रही आहे. काँग्रेस आणि भाजप यांना सीमा प्रश्नाचे सोयर सुतक आहे, असं वाटत नाही. मुळात हा प्रश्न निर्माण केला काँग्रेसने आणि भाजपला या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही. असेही शुभम शेळके म्हणाले.