आम्ही ज्यांना मित्र समजतं होतो, ते तर शत्रू निघाले :आदित्य ठाकरे

29

काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार टीका करणाऱ्या भाजपला पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी खड्या शब्दात प्रत्युत्तर दिल आहे .ज्यांना आम्ही मित्र समजत होतो, ते तर शत्रू निघाले अस ते आज हिंदी वृत्तवाहिनी ‘आज तक’शी बोलताना म्हणाले. वयक्तिक टीका करत ही मंडळी इतक्या खालच्या टोकाला जातील असा विचारही कधी केला नव्हता .जनता सगळं पाहतेय असही ते म्हणाले .

जिथे आम्हाला विश्वास मिळाला आहे. ज्यांना आम्ही मित्र समजत होतो, ते आम्हाला शत्रू समजू लागले आहेत.आणि ज्यांना आम्ही विरोधी पक्ष समजत होतो. त्यांनी आम्हाला मैत्रीचा हात दिला आणि राज्याच्या विकास कामासाठी पुढे आले .आम्ही मिळून राज्याच्या ,देशाच्या कल्याणासाठी चांगलं काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजप बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत हातमिळवणी करू शकतो,जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी सोबत युती करू शकतो .भाजप अशा पक्षांसोबत युती करतो आणि दुसऱ्यांना हिंदुत्वाबद्दल प्रमाणपत्र देतो .आम्ही आजपर्यंत कोणावरही वयक्तिक स्वरूपाची टिका केली नाही .वैयक्तिक वैर पत्करून बदल्याच्या भावनेने कधीही राजकारण केलं नाही असंही ते म्हणाले .

शिवसेना पुन्हा कधीही भाजप सोबत जाणार नाही का? तुम्ही ज्यांच्या सोबत इतकी वर्षे काम केलं , सरकार चालवलं तेच आज तुमच्या विरुद्ध उभे आहेत. राजकारणात कधीही कोणतंही वळण येऊ शकत. तुमच्या सोबतही अस होऊ शकत का ?असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी शिवसेनेत भावनेला महत्व आहे आणि प्रत्येक शिवसैनिक आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे अस उत्तर दिले.