राज्यात महिला सबलीकरणासाठी कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. महिलांना बचतगटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनवितानाच त्यांना उपजीविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करुन देण्याचे काम महामंडळ करीत आहे.
फिक्की या उद्योग क्षेत्रातील नामांकित संस्थेतर्फे ‘सॅनिटेशनचा बेस्ट पुरस्कार’ तसेच ई बिजनेस प्लॅटफॉर्मसाठी सलग दुसऱ्या वर्षी देशातील मानाचा ‘सिल्व्हर स्कॉच अॅवार्ड’ आणि कोविड काळातही सातत्याने कार्यरत राहून सामाजिक उत्तरदायित्व पार पाडल्याबद्दल ‘माविम’ अध्यक्ष ज्योती ठाकरे यांना ‘झी युवा सन्मान’ असे तीन सन्मान मिळाले आहेत.
अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि अधिकारी-कर्मचारी यांच्यासोबतच महामंडळांतर्गत कार्यरत बचतगटांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे.