बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा एकदा आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. तो आपल्या जबरदस्त परफॉर्मन्ससाठी नेहमी ओळखला जातो. या आगामी चित्रपटाचे नाव ‘गणपत’ असून लवकरचं रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सोशल मिडियावर त्याच्या आगामी चित्रपट ‘गणपत’ चे पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. चाहत्यांनी यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. यामध्ये टायगरचा वेगळाचं लुक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘गणपत’ चे दिग्दर्शक विकास बहल आहेत. यामध्ये टायगर एका बॉक्सरची भूमिका साकारत आहे. यासाठी त्याने ट्रेनिंगही घेतली होती. ट्रेनिंगचा एक व्हिडिओ देखील त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. टायगर बरोबर या चित्रपटामध्ये नुपूर सॅनॉन आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुपूर सॅनॉन हा चित्रपटातुन बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. टायगर श्रॉफचा या चित्रपटात दमदार अंदाज पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे यात टायगरचा आपुन डरता है ना तो आपुन बहोत मारता है, असा डायलॉग देखील ऐकायला मिळाला. यालाही चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
निर्मात्यांनी सोशल मिडियावर या चित्रपटाचा ट्रिझर शेअर केला आहे. हे शेअर करताना पोस्टमध्ये लिहले की, गणपत जेव्हा केव्हा येतो तेव्हा धमाल उडवून जातो, पाहा गणपतचा शानदार लूक. टायगर श्रॉफ या चित्रपटातुन पहिल्यांदाच जॅकी आणि विकास बहल सोबत काम करणार आहे. दरम्यान यांच्यासोबत काम करताना टायगरने आनंद व्यक्त केला आहे.