कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लोक शहर सोडून गावाकडे किंवा दूर फार्म हाऊसवर जाऊन राहत होते. मुंबईतल्या अनेक सेलेब्रिटीनी देखील शहरापासून दूर जाऊन आपल्या फार्महाऊसवर राहण्याचा आनंद घेतला. सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, धर्मेंद्र, सैफ अली खान यांनीही बाहेर जाऊन निर्सगाच्या सानिध्यात आनंद घेतला. सैफ पतोदीचा नवाब आहे. त्याच्या आसपास सतत नोकर असतात. सैफला आणि तैमुर अनेकवेळा मुंबईत घराच्या आसपास वॉक करताना पहिलं आहे. स्टारकीड मध्ये तैमुर नेहमी चर्चेत असतो. तो मीडियासमोर नेहमी ऍक्टीव्ह असतो. पुन्हा एकदा तो त्याच्या फोटोंमुळे चर्चेत आला आहे.
या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तैमुर चक्क शेती करताना दिसत आहे. यामध्ये तो वडील सैफ अली खानला मदत करत मातीमध्ये खेळताना दिसत आहे. सैफ आणि तैमुरचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड प्रमाणात आवडला आहे. यामध्ये तैमुर आणखी क्युट दिसत आहे. हे फोटो पटोडी हाऊसचे आहेत. पाण्याला जाण्यासाठी बनवलेल्या प्रवाहाच्या आसपास दोघे काम करत आहेत. सैफ आणि तैमुरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.