उजनी धरणातून इंदापूरला 5 टीएमसी पाणी वळवण्याचा निर्णय रद्द केल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तोंडी जाहीर केलं.त्यावरून उजनीच्या पाणी प्रश्नावरून सुरू असलेला संघर्ष पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सोमवारी सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत पंढरपूर-सातारा रोडवर निषेध व्यक्त करण्यात आला. याठिकाणी शेकडो शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवत याठिकाणी टायर जाळत आंदोलन केलं
उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या अतुल खुपसे, माऊली हाळनवर व दीपक वाडदेकर यांच्या समवेत शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी आंदोलन केलं. आंदोलकांनी पंढरपूर-सातारा रस्ता अडवला होता. या मार्गावर टायर जाळत आंदोलकांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तोंडी आदेश देत हा निर्णय रद्द केला आहे. मात्र तरीही आंदोलक अध्यादेश येईपर्यंत आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत.सोलापूरमधील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनीदेखिल या निर्णयाला विरोध केला होता.