पॉपस्टार रिहाना आणि ग्रीटा थनबर्ग यांनी शेतकर्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर संपूर्ण जगभरातून आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया ऊमटत होत्या. यादरम्यान इतर देशातील व्यक्तींनी आमच्या अंतर्गत बाबीत लक्ष घालू नये असे म्हणत आपल्या देशातील अनेक सेलीब्रीटींनी प्रत्युत्तर दिली. परिणामी ट्वीटर वॉर सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. #indiatogether या हॅशटॅगखाली भारतातील खेळाडू आणि केंद्र सरकारमधील नेत्यांनी ट्वीट केले होते. त्यानंतर मात्र विरोधकांनी आपल्या देशातील सेलीब्रीटींना आणि सरकारला यावरुन घेरण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम कॉंग्रेसमधील शशी थरुर आणि पी. चीदंबरम यांनी काही प्रश्न ऊपस्थित करत टीका केली. आता मात्र महाराष्ट्रातूनसुद्धा सेलीब्रीटींवर नाराजीचा सुर ऊमटत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सेना स्टाईलमध्ये टीका केली आहे. आंदोलनावर या सेलीब्रीटींनी सोयीस्कर भूमिका घेतली आहे. या सर्वांना भाजपने गाडीत टाकून सिंघू बॉर्डवर न्यावे अशी टीका राऊत यांनी केली. तर सरकार या सेलीब्रीटींचा वापर असल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले.
शरद पवारांनी मात्र यावर संयमाने भूमिका घेतली आहे. देशात पुष्कळजण आपल्यासारख्या महान व्यक्तींना आपला अादर्श मानतात. अशावेळी आपले क्षेत्र सोडून ईतर क्षेत्रांबाबत भाष्य करतांना थोडी काळजी घेणे अावश्यक आहे. असे शरद पवार यावर बोलतांना म्हणाले. सेलीब्रीटींनी केलेल्या ट्वीटवर सामान्य माणसांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे ईतर क्षेत्रांबद्दल थोडी माहिती घेऊन काळजी घेऊन बोलावे असा सल्ला सचिन तेंडूलकर आणि लता मंगेशकर यांना त्यांनी दिला आहे.
राज ठाकरेनीसुद्धा यावर प्रतिक्रिता दिली आहे. “लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर ही फार मोठी माणसं आहे. सरकार यांना अधुरी माहिती देऊन अशाप्रकारे ट्वीट करायला लावते हे अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान शेतकरी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टीसुद्धा सेलीब्रीटींवर चांगलेच तापले आहे. शेतकर्यांनी देशव्यापी चक्का जामचे आवाहन केले असता, शेतकरी स्वाभिमानी पक्षाने त्यास पाठींबा देत कोल्हापुरात आंदोलन केले. यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सेलीब्रीटींच्या मुद्यांवर आपले मत मांडले. तुम्ही जे स्वत:ला सेलीब्रीटी म्हणवून घेता त्यामागे लाखो लोकांचा प्रेम आहे. सरकारचे तुम्ही लाभार्थी असान तरिसुद्धा त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न तुम्ही करु नका, कारण लोकांना सत्य कळाले आहे. जनता केंद्र सरकारच्या विरोधात आहे आणि तुमच्याविरोधात जाण्यासुद्धा वेळ लागणार नाही.
भाजपच्या नेत्यांकडून मात्र या सेलीब्रीटींचे कौतुक होत असून त्यांना वाचविण्याचा प्रयत्नदेखील होतो आहे. केरळमध्ये सचिन तेंडूलकरच्या फोटोला काळे फासले असता आणि संजय राऊतांनी टीका केली असते. भारतरत्नांचा असा अपमान महाविकासआघाडी सहन करणार का असा प्रश्न त्यांनी केला आहे.