सीआयआयद्वारे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सितारमण यांनी सांगितलं की, मला तुमच्याही सुचना पाठवा. ज्यामुळे आम्ही असा अर्थसंकल्प तयार करू जो याआधी कधीच आला नसेल. भारताने 100 वर्षात असा अर्थसंकल्प पाहिला नसेल जो कोरोनाच्या संकटानंतर येईल.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटलं की, अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी त्या क्षेत्रांमध्ये काम व्हायला हवं ज्यांच्यावर कोरोनामुळे प्रचंड परिणाम झाला आहे. तसंच अशी क्षेत्रे जी पुढे विकासात योगदान देतील त्यावर लक्ष द्यायला पाहिजे. जागतिक आर्थिक विकासात आपले योगदान महत्त्वाचे असेल असंही निर्मला सितारमण यांनी सांगितलं.
आर्थिक वर्ष 2021-22 मधील अर्थसंकल्प संसदेत एक फेब्रुवारी 2021 ला सादर करण्यात येईल.जे विचार आले असतील त्याची संपूर्ण माहिती घ्यायला हवी. त्याशिवाय मला अभूतपूर्व असं बजेट तयार करणं अशक्य आहे.निर्मला सितारमण म्हणाल्या की, अर्थसंकल्प तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत तुमच्या सूचना आणि इच्छांची यादी मिळत नाही.
सरकार कोरोनामुळे फटका बसललेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे.आरोग्य, संशोधन आणि विकासात गुंतवणूक टेलिमेडिसिनसाठी मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प अभूतपूर्व असेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं.