संकटात शिवसेना मदतीला, खासदाराकडून रुग्णांसह कुटूंबियांसाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मदत केंद्र सुरू…

86

कोरोनाबाधित रुग्णांसह कुटूंबियांना या आपत्ती काळात अ‍ॅडमीटसह तपासणी, औषधोपचार, तसेच भोजनासह अन्य अडीअडचणीत मदतीकरिता शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेना मदत केंद्र कोविड 19 सुरू केले आहे.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी वसमत रस्त्यावरील संपर्क कार्यालयात या मदत केंद्राचे रितसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहूल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिका आयुक्त देविदासराव पवार, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावळी उपस्थित होते.

या मदत केंद्राव्दारे शहरी व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना, त्यांच्या कुटूंबियांना योग्य ते मार्गदर्शन मिळेलच त्यापाठोपाठ त्यांच्या अडीअडचणी व अऩ्य समस्यासुध्दा सुटतील, असा विश्वास खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला.

सरकारी व खासगी रुग्णालयांमधुन शिवसेनेचे कार्यकर्ते मदतीसाठी तैणात असणार असून संबंधितांनी या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, सर्वतोपरी मदतीचा हात निश्रि्चत मिळेल, असेही ते म्हणाले.