आयपीएलची रणधुमाळी सुरु आहे. आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांमध्ये अनुभवी खेळाडूंची मोठा भरणा आहे. यंदा नवख्या संजू सॅमसनकडे राजस्थानचे कर्णधारपद आहे. तर के. एल. राहुल पंजाबची धुरा सांभाळनार आहे. त्यामुळे दोघांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
आत्तापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये आयपीएलमध्ये 21 लढती झाल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने 12 लढतींमध्ये विजय मिळवला आहे.
तर पंजाब किंग्जला 9 लढतींमध्येच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आज होत असलेल्या लढतीत कुणाला विजय मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पंजाब आणि राजस्थान हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पंजाबने आपली संघबांधनी चांगली केली आहे. त्यामुळे राजस्थानला धक्का देण्याची तयारी पंजाबकडून होणार हे निश्चित. रात्री साडेसात पासून सुरू होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. त्यामुळे क्रिकेट रसिकांना मोठी मेजवानी मिळणार आहे.