टोल वाढणार पाच टक्क्यांनी

4

पुणे शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गासह नाशिक आणि सोलापूर महामार्गांवरील टोलचे दर दि.1 एप्रिलपासून वाढणार आहेत. 

केंद्र सरकार महागाईच्या
निर्देशांकानुसार प्रत्येक वर्षी राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दरामध्ये वाढ केली जाते. त्यानुसार येत्या 1 एप्रिलपासून पाच टक्‍क्‍यांनी वाढ होत आहे.

त्यामध्ये खेड शिवापूर, आणेवाडी, पाटस, सरडेवाडी, चाळकवाडी आणि हिवरगाव पावसा या टोल नाक्‍यावर सध्या आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये पाच टक्‍क्‍यांनी वाढ होणार असून, त्याचा फटका वाहनचालकांना बसणार आहे.

नवे टोल दर गुरुवारपासूनच आकारले जातील, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले.