शनिवार, रविवारच्या लॉकडाऊनला सहकार्य करण्याची भूमिका घेताना दुसरीकडे सोमवारपासून नियमितपणे दुकाने उघडण्याचा निर्णय आज बारामतीतील व्यापाऱ्यांनी घेतला.
व्यापाऱ्यांनी आता काहीही झाले तरी सोमवारी सकाळी नऊ वाजता दुकाने उघडायचीच, असे ठरवले आहे. आज बारामतीत व्यापाऱ्यांची महत्वाची बैठक झाली
यावेळी अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, सचिन सातव, सुशील सोमाणी, स्वप्निल मुथा, प्रवीण गांधी, चेतन व्होरा, अभय गादीया, संजय सोमाणी, बाळू चांदगुडे, सुधीर वाडेकर, परेश वीरकर, नरेंद्र मोता, शैलेश साळुंखे, सुरेंद्र मुथा, फखरु भोरी, जगदीश पंजाबी, प्रवीण आहुजा, प्रमोद खटावकर, किरण गांधी यांच्याह अनेक व्यापारी उपस्थित होते.
लॉक़डाऊनला कंटाळलेल्या बारामतीच्या व्यापाऱ्यांनी आता एल्गार पुकारला आहे.आज बारामती व्यापारी महासंघाचा हा निर्णय अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी शहरातील सर्व व्यापाऱ्यांपर्यंत पोहचविला आहे.