दुःखद : बारामतीच्या माजी नगराध्यक्षाच्या आई-वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू

107

बारामतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा संध्या बोबडे या त्यांच्या कन्या. एकाच दिवशी आई वडीलांच्या मृत्यूने बोबडे कुटुंबियांवर प्रचंड आघात झाला.काल संध्या बोबडे यांचे व़डील शांताराम शिंदे (वय 89 ) व आई पुष्पावती शिंदे (वय 80) यांचे अगदी काही तासांच्या अंतराने निधन झाले. 

बारामतीतीलच एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. काही काळ त्यांनी उपचाराला साथही दिली पण काल मात्र प्रारंभी शांताराम शिंदे यांची प्रकृती खालावली व त्यांची प्राणज्योत मालविली. 

शांताराम शिंदे मातीपरिक्षण अधिकारी होते, नोकरीच्या निमित्ताने राज्यातील विविध शहरात त्यांनी काम केलेले होते.दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातून थोड अंग दुखतय म्हणून विश्रांतीसाठी मुलीकडे म्हणजेच संध्या बोबडे यांच्याकडे ते आले होते.