अभिनेत्री भुमी पेडणेकरच्या आगामी चित्रपटाचा ट्रिझर लाँच झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर खूप थरकाप उडवणारा आहे. या चित्रपटाचे नाव ‘दुर्गावती’ होते परंतु आता हे बदलून ‘दुर्गामती’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचा निर्माता अक्षय कुमार असून भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे. भागमती असे याचे मुळ नाव आहे. हा चित्रपट 11 डिसेंम्बर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मस् वर प्रदर्शित होणार आहे.
‘सगळ्यांचा बदला घेण्यासाठी दुर्गामती येतेय’, अशी टिझरलाईन या भूमीने आपल्या सोशल मीडियावर दिली आहे. त्यावरून हा सिनेमा सुडावर आधारित असल्याचे दिसून येत आहे. हा ट्रेलर पाहून अस समजतं की, हा सिनेमा खूप भयावह आहे. हा सिनेमा एक निर्दोशी सरकारी अधिकाऱ्याची कहाणी सांगतो जिला मोठ्या कारस्थानाचं शिकार बनवलं जातं. भूमी पेडणेकर यामध्ये एका वेगळ्या अवतारात पाहायला मिळत आहे. चित्रपटात भूमीने चंचल चौहान नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. यामध्ये तिला चौकशीसाठी दुर्गामती हवेलीत घेऊन जातात. चौकशीत चंचल साधारण मुलीपेक्षा वेगळ्या अवतारात दिसते. भूमी दुर्गामतीच्या भूमिकेत खूप आक्रमक दिसते.
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर भूमीने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला होता. मूळ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अनुष्का शेट्टी झळकली होती. तिच्यामध्ये राणी नामक तरुणीचा आत्मा शिरतो असं दाखवलं होत. या चित्रपटात भूमीसोबत अर्शद वारसी, माही गिल, जिशु सेनगुप्ता, करण कपाडिया हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर 11 डिसेंम्बरला रिलिझ होणार आहे.