सेलीब्रीटींनीविरोधात बोलणारे देशद्रोही! सेलीब्रीटींच्या समर्थनार्थ या खासदाराचे वक्तव्य

9

शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेले ट्वीटर नाट्य अद्यापही संपलेले नाही. पॉपस्टार रिहाना आणि ग्रीटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते. त्यानंतर भारतीय सेलीब्रिटींनी #indiatogether या हॅशटॅगअंतर्गत परदेशी सेलीब्रीटींना एकप्रकारे प्रत्युत्तर दिले होते. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचासुद्धा समावेश होता. भारतीय सेलीब्रीटींच्या या प्रत्युत्तरादाखल केेलेल्या ट्वीटनंतर शेतकरी आंदोलनाविरुद्ध हे ट्वीट असे वळण या प्रकरणांस लागले आणि त्यांनतर सचिन तेंडुलकरसह ईतरही सेलीब्रीटींवर संपूर्ण देशभरातून टीका झाली. भाजपने सेलीब्रीटींच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. त्यानंतर या घटनेस राजकीय वळण लागले आणि देशभरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. अशांतच अमरावती मतदारसंघाच्या खा. नवनित राणा यांनी यावर आपले मत मांडले आहे. सेलीब्रीटींविरोधात बोलणारे देशद्रोही असल्याचे त्या यावेळी म्हणाले. दिल्लीत सुरु असल्याल्या अधिवेशनामुळे त्या दिल्लीत आहेत. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“देशाचे राष्ट्रीय नायक देशाच्या बाजूने आहे की विरोधात हे ठरविण्याचा अधिकार कुणालाही नाही. आपले लोकशाही राज्य आहे. ईथे व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. जर सेलीब्रीटींच्या त्या ट्वीटवरुन त्यांच्याबद्दल कुणी मत बनवत असेल तर ते खरे देशद्रोही आहेत.” सेलीब्रीटींना समर्थन देत अशी खरमरीत टिका नवनित राणा यांनी सेलीब्रीटींविरोधात बोलणार्‍यांवर केली आहे.

नवनित राणा या अमरावती मतदारसंघाच्या खासदार आहे. त्यांचे पती रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडून त्या निवडून आल्या आहे. अमरावती मतदारसंघात त्यांचे वर्चस्व आहे. दिल्लीतील अधिवेशनात त्या कायम भूमिका घेत असतात. देशात सुरु असणार्‍या घटनांवर व्यक्त होत असतात. तसेच नवनित राणा महराष्ट्रातील विदर्भाच्या समस्या दिल्ली दरबारी मांडून विदर्भाचा आवाज दिल्लीत बुलंद करत असतात अशीसुद्धा त्यांची ख्याती आहे. त्यामुळे देशातील या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

नवनित राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेचे ऊमेदवार आनंद अडसुळ यांचा पराभव केला होता. यावेळी भाजपच्या गोटातून त्यांना मदत झाली असल्याच्या चर्चा रंगत होत्या. संपूर्ण देशभर विरोधी पक्षातील अनेक नेते सेलीब्रीटींवर टीका करत आहे. अशांतच भाजप पूर्णपणे सेलीब्रीटींच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन या टीकांना प्रत्युत्तर देते आहे. नेमके यावेळीच नवनित राणा यांनी घेतलेल्या या सेलीब्रीटी समर्थनार्थ भूमिकेवरुन राजकीय चर्चांना ऊधान आले आहे.