माळेगाव बुद्रूक ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये

8

बारामती येथील माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचे रूपांतर नागरपंचयती मध्ये होणार आहे. राज्य सरकराच्या नगरविकास खात्याने त्यासंबंधीची अधिसूचना जारी केल्याने माळेगावात एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानुसार शिवाजी चौकात एकत्र येत गावकऱ्यांनी शासन निर्णायाचे फटाक्यांची अतषबाजी करीत स्वागत केले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जयघोष केला. 

ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये व्हावे, यासाठी गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या मागणीला पवार यांनीही पाठींबा देत शासनस्तरावर नगरपंचायत अस्तित्वात येण्याकामी कमालीची यंत्रणा हलविली होती. 

त्यासाठी बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, दिपक तावरे, दत्तात्रेय येळे, रोहिणी रविराज तावरे, शिवराज जाधवराव, दिलीप तावरे, संजय भोसले, अॅड. राहूल तावरे, रणजित अशोक तावरे, जयदीप तावरे, रविराज तावरे, रमेश गोफणे, शकील सय्यद, अविनाश गोफणे, प्रशांत मोरे, शौकत शेख, प्रमोद जाधव, भगावन गोंडे, अशोक सस्ते, प्रमोद तावरे, प्रदीप जाधव, नितीन तावरे, निंबाळकर, पैठणकर आदींनी निर्णायक भूमिका घेतली होती.

नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याचे पाणी देणे, गावातील सार्वजनिक स्वच्छता ठेवणे आणि गावकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेण्यासाठी विशेष प्रय़त्न केले जातील. त्याकामी गावातील विविध संस्थांचे आजीमाजी पदाधिकाऱ्यांचे सहकार्यही घेतले जाईल, अशी माहिती प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितली.