दि.१४ फेबृवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफ जवनांवर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकाचवेळी ४० जवान हुतात्मा झाले होते. भारतवासियांसाठी हा एकप्रकारे काळा दिवसच होता. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अद्यापही अोल्याच आहे. याअनुषंगानेच कारंजातील सकल नेवी समाजाच्यावतीने श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊपस्थित युवकांकडून दिपप्रज्वलन करुन वीर जवानांना शहरातील शनी मंदिर याठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरवर्षी दि.१४ फेबृवारीस सकल नेवी समाजाच्यावतीने पुलवामा येथे शहिद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पन करण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. यावर्षिसुद्धा नेवी समाजातील युवकांकडूम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास हेमंत फुलाडी आणि वाशिम जिल्हा विस्तारक अ.भा.वि.प. कौस्तुभ मोहदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुत्रसंचलन अजिंक्य जवळेकर याने केले. कौस्तुभ मोहदुरकर यांनी ऊपस्थितांशी संवाद साधला तसेच कार्यक्रमाचा समारोप मंगेश मेटकर यांनी केला.
कार्यक्रमात सकल नेवी समाज आणि दत्त मंदिर मित्रमंडळ येथील युवक प्रचंड संख्येने ऊपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात शुभम राऊळ, आदर्श वैद्य, दर्शन वैद्य, राहुल देशमुख,निलय बोन्ते, आशिष वैद्य, शुभम गंधक, वैभव राऊळ, युवकांनी महत्वाची भूमिका निभावली.