शहीद दिनाच्या पार्श्वभूमिवर कारंजात क्रांतीकारकांना अर्पण करण्यात आली श्रद्धांजली

31

भारत देशाला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचि बाजी लावली आहे. त्यापैकीच युवकांचे प्रेरणास्त्रोत असणारे भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे २३ मार्च १९३१ रोजी या वीर सपुतांना जुलमी ब्रिटीश राजवटीने फासावर चढवले होते. या पार्श्वभूमिवर भारतात शहिद दिवस साजरा करुन भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या कार्याची आठवण केली जाते. वाशिम जिल्ह्यातील कारंजा याठिकाणीसुद्धा शहिद भगतसिंह मित्रमंडळ व अ.भा.वि.प. शाखा कारंजा यांच्यावतीने शहिद दिवसपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कारंजा शहरातील जयस्तंभ चौक याठिकाणी शहिद भगत सिंह यांच्या प्रतिमेस दिपप्रज्वलन व हारार्पन करुन कार्यक्रमा सुरुवात करण्यात आली. यावेळी गौरव साखरकर आणि गजानन अहमदाबादकर यांनी मनोगत व्यक्त केले. वयाच्या अवघ्या २४ वर्षात भगत सिंह यांनी केलेल्या परक्रामाचे वर्णन यावेळी गजानन अहमदाबादकर यांनी केले. तसेच भगत सिंह यांचे अवघा २४ वर्षांचा कार्यकाळसुद्धा युवाशक्तीने प्रेरीत असलेला नविन भारत निर्माण करण्यास पुरेसा असल्याचे मत गौरव साखरकर यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रितेश चौकसे यांनी विषेश परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमास उमेश महाजन,मुकेश राय ,ललित चांडक, मोतिसेठ बंग,आशिष तांबोळकर,गुटरु शिवहरे ,अक्षय ऊसरटे ,संदीप गढवाले ,गौरव कूर्मवनशी ,विजय काळे ,कुणाल महाजन ,संदीप काळे,सचिन कानोजे,अंशुल सिंगही,शशी वेरुळकर, तुषार उसरते,प्रशांत राठोड ,निखिल पंजवानी आनंद मापारी,सुदंशु राय, ओम शेलवनटे,शरद शिवहारे,सचिन काळे,आकाश शर्मा, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.