औरंगाबादेत तिहेरी हत्याकांड, एकाच वेळी एकाच कुटुंबातील चौघांवर हल्ला

2

बातमी औरंगाबादची आहे. तिहेरी हत्याकांडाने औरंगाबाद हादरलं आहे. औरंगाबादमधील पैठण तालुक्यात ही घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार व्यक्तींवर जीवघेणा हल्ला करण्यात आला, त्यात आई वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सहा वर्षाचा मुलगा जखमी अवस्थेत पडलेला पहायला मिळाल.

हे हत्याकांड नेमकं कशामुळे झालं याची अद्याप माहिती नाही. घटनास्थळावर पोलीस, डॉग स्कोड तपास करत आहेत. पूर्व वैमनस्य अथवा चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. औरंगाबादच्या पैठण येथील या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आई वडील आणि मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला असून, मुलगा जखमी अवस्थेत होता, त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. स्थानिक पोलीस प्रशासन याबाबत अधिक चौकशी करत आहे.