पाकिस्तानच्या एका पायलटने उड्डाणादरम्यान एक युएफओ पाहिल्याचा दावा केला होता. उड्डाणादरम्यान त्याला आकाशात एक चमकदार युएफओ दिसल्याचं त्यानं म्हटलं आहे. सरकारी विमान कंपनीच्या वैमानिकाने केलेल्या या दाव्याची मात्र सोशल मीडियावर खिल्ली उडत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यास पाकिस्तानात यावर चर्चा सुरु झाली आहे. काही लोक इतके घाबरले आहेत की याला एलियन म्हणत एलियंस अटॅक होण्याची भीती जाहीर करत आहे.
लाहोरहून कराचीदरम्यानच्या उड्डाणात रहीम यार खान या वैमानिकाला युएफओ दिसल्याचं वृत्त जिओ न्यूजनं या वैमानिकाच्या हवाल्याने दिले होते. PIA च्या पायलटने उड्डाणादरम्यान आकाशात UFO बघून आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले. हे वृत्त पसरताच सोशल मीडियावर मात्र पाकिस्तानला ट्रोल करण्यास सुरुवात झाली.
सूत्रांनी सांगितल्यानुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या पायलटनं रहीम यार खान या क्षेत्राजवळ ही युएफओ पाहिली. एअरबस ए -320 ही नेहमीची फ्लाइट उडवताना त्याला ही यूएफओ दिसली. लाहोर ते कराचीदरम्यान हे विमान होतं. हा पायलट म्हणाला, ‘अचानक आकाशात अतिशय लखलखीत UFO दिसली. अगदी प्रखर सूर्यप्रकाशातही तिचं अस्तित्व जाणवत होतं. दिवसाच्या प्रकाशात अशी गोष्ट दिसणं हे अतिशय दुर्मिळ आहे.’ पायलटच्या मते, हा कुठला ग्रह नसून एखादं Space Station (अवकाश-स्थानक) किंवा कृत्रिम ग्रह असू शकेल.