तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली, ‘या’ पदावर नियुक्ती

232

काही मोजक्या प्रामाणिक अधिकाऱ्यांमध्ये आयएएस ऑफिसर तुकाराम मुंढे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. तुकाराम मुंढे आणि बदली हे समीकरण झालं आहे. तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय, कडक स्वभावामुळे ओळखले जातात. राजकीय नेत्यांचे व त्यांचे वाद सुद्धा पाहायला मिळाले होते.

काही महिन्यांपूर्वी नागपूर महापालिका आयुक्तपदावरून मुंडे यांची बदली करण्यात आली होती.आता त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिवपदी ते कार्यरत होते. आता अवघे पाच महिने देखील पूर्ण होण्याआधी पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे.

त्यांची राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. उदय जाधव यांची राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्यसचिव अरविंद कुमार यांची मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात बदली करण्यात आली आहे. डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे ज्वॉईंट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली आहे.

.