तुषार भोसले हा भोंदु व्यक्ती! राष्ट्रवादीचा भाजपच्या अध्यात्मीक आघाडीवर हल्लाबोल

19

आषाढीची पंढरपुरची वारी हा वारकरी बांधवांसहीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी श्रद्धेचा विषय आहे. या वारीमध्ये मोठ्यासंख्येने वारकरी सहभागी होऊन वारीचा आनंदोत्सव साजरा करीत असतात. गेल्या वर्षी कोरोना विषाणु संसर्गामुळे या वारीवर बंधने आली होती. यावर्षिसुद्धा तशीच स्थिती आहे. परंतू वारी ही हजारो भाविकांसह पायीच झाली पाहिजे असा आग्रह भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने केला आहे. मात्र यावर सत्तेतील राष्ट्रवादी कॉंग्रेंसकडून जोरदार प्रत्यत्तर देण्यात आले आहे.

यंदाची वारी ही पायीच झाली पाहिजे. मुंख्यमंत्र्यांनी त्वरित वारकरी बांधवांची बैठक घेत वारीची नियमावली जाहीर करावी असे भाजपा अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले म्हणाले आहेत. तुषार भोसलेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अॅड. भुषण राऊत यांनी समाचार घेतला आहे.

तुषार भोसले हा वारकर्‍यांचा प्रतिनिधी नसून वारकर्‍यांच्या जिवाशी खेळणारा भोंदू व्यक्ती आहे. अॅड. भुषण राऊत यांनी अशा आशयाचे ट्वीट करत तुषार भोसलेंवर निशाना साधला आहे. आज वारीची मागणी केली जात आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याची जवाबदारी कोण घेणार? वारकर्‍यांच्या जीवाशी या माणसाला काही देणे घेणे नाही असेसुद्धा या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

गेल्य‍ा वर्षीच्या वारीवर कोरोनाचे सावट होते. यंदासुद्धा तीच परिस्थिती आहे. संसर्गाचा वेग कायम असल्यास पायी वारीची मागणी किती संयुक्तीक आहे. अशी विचारणा राष्ट्रवादीकडून केली जात आहे.