कोविड सेंटरमधून टिव्ही, इंटरनेट इ मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करणार : पालकमंत्री नवाब मलिक

3

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय, आयटीआय व जिल्हा परिषद नुतन इमारतीतील कोविड सेंटरवर एलईडी कार्यान्वीत करण्यात आले असून यासह इतरही ठिकाणी ही मनोरंजनात्मक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्णांवरील मानसिक ताण कमी व्हावा, विरंगुळा मिळावा यादृष्टीने प्रशासनाने काही उपाययोजना राबविण्याचा विचार केला आहे. त्यापैकी टीव्ही, इंटरनेट सारख्या सुविधा प्रामुख्याने उपलब्ध केल्या जात आहेत. या केंद्रावर सीसीटीव्ही सुध्दा बसविल्या गेले असल्याची माहिती त्यांनी दिली.

दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण घाबरत असल्याने त्यांचे मन इतरत्र वळवण्यासाठी त्यांना कोविड सेंटर मध्ये मनोरंजन करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात अन्य कोरोना सेंटरवर सुद्धा मनोरंजन साहित्य उपलब्ध होणार आहे.