बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ दिवसापासून मिळणार बोर्डाकडून परीक्षेचे प्रवेशपत्र

26

7 एप्रिल रोजी पुणे बोर्डाकडून शाळांना परीक्षेचे प्रवेशपत्र वितरीत केले जातील. 10 एप्रिलपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून ते घेऊन जावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक अंतिम केले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोलापूर, जळगाव, नागपूर, पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, मुंबई, ठाणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमधील काही पालकांनी परीक्षा ऑनलाइन घ्यावी अथवा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

पुणे बोर्डाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत परीक्षा केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ते शिकत असलेल्या शाळांमध्येच परीक्षा होईल, असे नियोजन केले. 

परीक्षार्थींना मास्क बंधनकारक केला जाणार असून त्यांना पेपर सुरू होण्याच्या पाऊण तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा – महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक – प्राचार्यांना दिल्या आहेत.