दंगल भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन ट्विटरने या नेत्याचे अकाउंट कायमस्वरुपी बंद केले

19

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने जोरका झटका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट ट्विटरने कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन, ट्विटरने ही कारवाई केली. ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये हिंसाचार, तोडफोड केली. यामुळे ट्विटरने हा निर्णय घेतला.

डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट बंद केल्यानंतर ट्विटरने स्पष्टीकरण दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट्समुळे अमेरिकेत दंगे भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला असे ट्विटरने म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल डोनाल्ड ट्रम्प यांना मान्य नाही. ते गुरुवारी अमेरिकन संसदेवर हल्ला झाल्यावर सुद्धा चिथावणीखोर ट्विट करत होते. त्यामुळे त्यांच्यावर ट्विटरने करवाई केली आहे.