मोदीजींच्या नावे ट्रेंण्ड होतोय ट्वीटर हॅशटॅग! जाणुन घ्या …..

13

देशात बेरोजगारीचे प्रमाणात सातत्याने वाढ होते आहे. कोरोनातील लॉकडाऊनमुळे तर त्यात अधिकच भर पडली. बेरोजगारी हा राजकीय मुद्दा बनतो आहे. सोबतच भारतीय युवकांमध्ये वाढत्या बेरोजगारीवरुन प्रचंड नाराजी आहे. चांगले शिक्षण घेऊनसुद्धा नोकरी न मिळाल्यामुळे युवकवर्गात नैराश्य वाढते आहे. आता युवकांनी यावर आवाज ऊठबत थेट पंतप्रधानांनाच नोकरी देण्याचे आवाहन केले आहे. #modiji रोजगार दो हे हॅशटॅग ट्वीटरवर टॉप ट्रेंण्ड होते आहे. देशभारातून या हॅशटॅगअंतर्गत अनेक युवक रोजगाराची मागणी करणारे ट्वीट करत आहे.

आतापर्यंत “#modiji रोजगार दो” या हॅशटॅगअंतर्गत ६ लाख ७४ हजारांहून अधिक ट्वीट करण्यात आले आहे. दरम्यान यावरुन विरोधकांकडूनसुद्धा केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. मोदी सरकारने दोन कोटी नोकरी देण्याचे आश्वासन केले होते. मात्र सरकारला याचा विसर पडला आहे. राहुल गांधी यांनीसुद्धा या हॅशटॅगअंतर्गत ट्वीट करत पंतप्रधानांवर निशाना साधला आहे. “सुनो जन की बात” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या शेवटापासून आपल्या देशात लॉकडाउन लावण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये अनेक पगारदार व्यक्तींना नोकरी गमवावी लागली आहे. सीएमआईईच्या अहवालानुसार २०२० या वर्षात १ कोटी ७७ लाख पगारदार व्यक्तींनाबनोकरी गमवावी लागली आहे. सोशल मिडियावर हॅशटॅगअंतर्गत प्रचंड मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत.

आयएलअो संस्थेच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीची समस्या भारतातील शेजारी राष्ट्रांनासुद्धसा सतावते आहे.

जागतीक पातळीवर बेरोजगारीचे प्रमाण ५७ टक्के आहे तर भारताचे प्रमाण ४७ टक्के आहे. पाकीस्तानमध्ये बेरोजगारीचे प्रमाण ५० टक्के आहे. श्रीलंकेत ५१ टक्के तर बांग्लादेशात ५७ टक्के आहे.