बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. अभिवन देशमुख, अतिरिक्त अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सखोल तपासाचे आदेश दिले होते.
शहर पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कामगिरीत चोरीला गेलेल्या वीस लाखांच्या 18 दुचाकी जप्त करत तिघांना अटक करण्यात आली. चोरटयांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आज पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली.
पोलिसांनी योगेश विलास चिरमे (वय 23, रा. झारगडवाडी, ता. बारामती) याच्यासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना अटक केली आहे.