वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आळंदीतील प्रकार; वारकरी संस्थेत ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य

16

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीतून अत्यंत किळसवाणी बातमी समोर येत आहे. वारकरी संस्था चालकाने शिक्षण घेत असलेल्या ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा किसळवाना प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणारा आरोपी शिवप्रसाद रामनाथ भोकनळ याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. श्री माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ११ वर्षीय मुलाला वारकरी शिक्षणासाठी पालकांनी पाठवले होते. संस्थेतील मुलांना आरोपी शिवप्रसाद भोकनळ हा वारकरी संप्रदायाचे शिक्षण देत होता.

दरम्यान, पीडित मुलाला घरी पाहुणे आल्याने आईने घरी आणले. तेव्हा, भोकनळ यांनी पीडित मुलाला लवकर संस्थेत पाठवा असे पालकांना सांगितले. पीडित मुलाने संस्थेत जायला नकार देत रडू लागला. आईने मुलाची विचारपूस केली असता सदरील घटना उघडकीस आली.

शिवप्रसाद भोकनळ याने सर्व मुलं हरिपाठ करण्यासाठी जाताच,पीडित मुलाला तुझ्याकडे काम आहे असे म्हणत थांबवले. आणि एका खोलीत नेऊन त्यावर अनैसर्गिक कृत्य केले. पीडित मुलाला कुठे वाच्यता केल्यास तुला बघून घेईन. अशी धमकी देखील दिली.