राज्य सरकारने कडक निर्बंधाच्या नावाखाली लावलेल्या लॉकडाऊनचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध होतो आहे. भाजपचे राज्यसभा खा.ऊदयनराजे भोसले यांनी अनोख्या प्रकारे या लॉकडाऊनचा निषेध नोंदवला आहे. ऊदयनराजे भोसले यांनी थेट कटोरा घेऊन भीकमांगो आंदोलन केरत सरकारवर निशाना साधला आहे.
“लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान होते आहे. सणासुदीचा काळ आहे. व्यापार्यांनी कर्ज घेऊन माल भरला आहे. परंतू लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर ऊपासामारीची वेळ आली आहे. सर्वसामान्यांचेसुद्धा यामध्ये प्रचंधस हाल होत आहे.” असे ऊदयनराजे यावेळी म्हणाले.
ऊदयनराजे भोसले यांनी पायदळच जिल्हाधिकारी कार्यालय गाठत त्याठिकाणी आपले आंदोलन संपवले. यावेळी ऊदयराजेंनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली. सरकारमध्ये जी तज्ज्ञ मंडळी बसली आहेत ती मला तज्ज्ञ वाटत नसल्याचे ते म्हणाले.
लॉकडाऊन हा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कधीच पर्याय होऊ शकत नाही हे माहिती असतांनासुद्धा सरकार लॉकडाऊन लावते आहे. मुळात आपले काळे कारनामे लपवण्यासाठी सरकार हा लॉकडाऊनचा खेळ खेळते आहे. सरकारने यावर विचार करणे गरजेचे आहे. लोकांची मनस्थिती खराब झाली आहे. यातुन संघर्ष झाल्यास यांस सरकार जवाबदार असणार असल्याचेसुद्धा त्यांनी यावेळी म्हटले.