तौक्ते वादळामुळे गुजरात आणि दीव दमणचं मोठं नुकसान झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
तसेच पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते सगळं करणार आहे.कोणत्या निकषानुसार मदत जाहीर करायची हे नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ठरवणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.