राठोडांचा राजीनामा स्विकारण्यावरुन ऊद्धव ठाकरे द्विधा मनस्थितीत?

42

पुजा चव्हान संशयीत मृत्यु प्रकरणात नाव समोर आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा पाठवला आहे. परंतू राजीनामा स्विकारण्यावरुन शिवसेनेत दोन मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती मातोश्रीवरील सुत्रांनी दिली. संजय राठोड यांच्या राजीनामा घ्यावा असे एका गटाचे म्हणने आहे तर राजीनामा स्वीकारल्यास असा पायंडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजीनामा स्विकारु नये असे एका गटाचे म्हणने आहे. परिणामी राजीनामा स्विकारण्यावरुन ऊद्धव ठाकरे द्विधा मनस्थितीत असल्याचे कळते आहे.

पुजा चव्हानच्या आत्महत्येनंतर काही अॉडिअो क्लीप व्हायरल झाल्या होत्या. यानध्ये शिवसेनेचे मंत्री आणि दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांचे नाव पुढे आल्याने चांगलेच राजकारण तापले होते. भाजपने आक्रमक पवित्रा घेत संजय राठोड यांच्या राजिनाम्याची मागणी लावून धरली होती. संजय राठोड यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा पाठवला. मात्र राजीनामा स्विकारण्यावरुन शिवसेनेत दोन मतप्रवाह पडले आहेत.

राजीनामा स्विकारल्यास यापुढे कुठल्याही प्रकरणांत विरोधकांकडून असाच दबाव आणण्यात येईल. परिणामी हा पायंडाचा पडेल असे एका गटाचे म्हणने आहे. यवतमाळ जिल्ह्यात खा. भावना गवळी आणि आ. संजय राठोड यांचे दोन गट असल्याचे ऊघड आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरु असतांना भावना गवळी गट सक्रीय झाला आणि राजीनामा स्विकारण्यासंबंद्धी मागणी करु लागला होता. परंतू ऊद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेतील नामवंत नेते एकनाथ खडसे यांनी संजय राठोड यांच्या सनर्थनार्थ भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांचा आमदारांवर प्रभाव आहे. त्यामुळे शिंदे गट राजीनामा स्विकारु नये अशी मागणी करत आहे. तसेच राजीनामा स्विकारण्यासाठी स्थानिक गटबाजीतून दबाव आणला जात आहे. असेही शिंदे गटाचे म्हणने आहे.

संजय राठोड हे बंजारा समाजातून येतात. महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे नेते म्हणून त्यांची अोळख आहे. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या भागातील समाजात त्यांचे प्रचंड वर्चस्व आहे. बंजारा समाज त्यांच्या पाठीशी आहे. राजीनामा स्विकारल्यामुळे कुठेही हानी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून सावध भूमिका घेतली जात आहे.