काल बुधवारी(दि.३ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तीसरा दिवस पार पडला. यामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला. अनेक मुद्द्यांना ऊचलून धरत त्यांनी सरकारला खडेवोल सुनावले. यामध्येच त्यांनी “शेतकर्यांच्या नार्गात खिळे आणि चीनसमोर पळे” हे वक्तव्य केले आणि त्यानंतर भाजपने ऊद्धव ठाकरेंवर पलटवार करण्यास सुरुवात केली. यादरम्यानच भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींशी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे विनामाहितीच्या आधारेच बोलत असतात, विधाने करत असतात. असा भाजपचा दावा आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांचि नेहमिच हेटाळणी केली जाते. ऊद्धव ठाकरेसुद्धा अशाचप्रकारे विनामाहितीच्या आधारे बोलायला लागलेत असा या विधानाचा बोध होतो.
मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी चिनसमोर पळे असे म्हणत भारतीय सैन्याचा अपमान केला आहे. या विनाआधार आणि अपमानजनक विधानासाठी त्यांनी संपूर्ण भारताची माफी मागावी अशी मागणीसुद्धा भातखळकर यांनी केली आहे. तसेच जनता राहुल गांधीगिरीचा चांगोाच समाचार घेईल असेसुद्धा त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान सभागृहातसुद्धा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन त्यांच्यावर निशाना साधला आहे. चिनसमोर पळे असे म्हणने म्हणजे हा भारतीय सैनिकांचा अपमान आहे असे फडणवीस म्हणाले होते.