दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे भंडाराकडे रवाना

14

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी भंडारा येथे जाणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 10.10 वाजता वर्षा बंगल्यावरुन भंडाराकडे रवाना होतील. दुपारी 1 वाजता ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डला शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत 17 नवजात बाळांपैकी 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दुर्दैवी मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागली. या आगीतून 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला.